Mla shaymsunder shinde corona positive news
Mla shaymsunder shinde corona positive news 
छत्रपती संभाजीनगर

नांदेड जिल्ह्यातील आणखी एक आमदार कोरोनाग्रस्त

हफीज घडीवाला

नांदेड ः जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना कोरोनाने आपल्या विळख्यात घेण्याचे चक्र काही केल्या थाबंत नाहीये. अशोक चव्हाण यांच्यापासून ते खासदार प्रताप पाटील चिखलिकरांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली. यावर मात करून हे लोकप्रतिनिधी पुन्हा कामाला देखील लागले. आता जिल्ह्यातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी दिली आहे. श्यामसुंदर यांच्यावर मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचीचेही आशा शिंदे यांनी ‘सरकारनामा‘शी  बोलतांना सांगितले.

गेल्या सहा महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा पादुर्भाव सुरू आहे. नांदेड जिल्ह्यासह कंधार व लोहा तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. परंतु अशावेळी योग्य ती काळजी घेत आमदार श्यामसुंदर शिंदे मतदार संघातील विकास कामासाठी, अतिवृष्टी बाधित पिकांच्या पंचनाम्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलासा मिळावा व मतदारसंघातील कामासांठी विकास निधी मिळवण्यासाठी सक्रीय होते. सर्वसामान्यांशी संवाद प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या ते सातत्याने संपर्कात होते.
  
शुक्रवारी (ता.२५) आमदार शिंदे मुंबईला असतांना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने तपासणी करून घेतली असता सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझेटिव्ह आला. यामुळे त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.  दरम्यान, श्यामसुंदर शिंदे यांची प्रकृती चांगली असून काळजी करण्याचे कारण नाही, असे आवाहन त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांना केले आहे.

आशा शिंदे यांनाही आठ- दहा दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मुबईत उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. डॉक्टरांच्या सल्ल्याने सद्या त्या मुंबई येथील घरी विश्रांती घेत आहेत. आणखी चार-पाच दिवस क्वारंटाइन राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सातत्याने मतदारसंघातील कामानिमित्ताने तसेच कोरोनावर उपाययोजना करण्याच्या निमित्ताने अनेकांच्या संपर्कात येतात. योग्य काळजी घेऊनही कोरोना त्यांना गाठत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

जिल्ह्याचो पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार राजूरकर, मोहन हंबर्डे, यांच्यासह काही आमदार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर व सर्वच राजकीय पक्षाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.

Editd By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT