Vinayak mete reaction news
Vinayak mete reaction news 
छत्रपती संभाजीनगर

 राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी

दत्ता देशमुख

बीड ः मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसंग्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे.जिल्ह्यातील केतुरा येथील विवेक रहाडे या बारावी पास झालेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्मबलिदान देणे हा पर्या नसून समाजातील मुलामुलींनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी असे आवाहनही मेटे यांनी केले आहे.

 शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने १५ दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. मात्र, आता आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे शुल्क भरून शिक्षण घेणे अवघड आल्याच्या तणावातून त्याने बुधवारी दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटने बद्दल दुःख व्यक्त करतांनाच मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी गेल्याचे विनायक मेटे म्हणाले. "माझ्या बीड जिल्ह्यातील केतुरा या गावचा रहिवाशी असलेल्या मराठा समाजातील विवेक कल्याण रहाडे या १२ वि इयत्ता पास झालेल्या विद्यार्थ्याने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती. मराठा समाजाच्या आरक्षण स्थगितीवरील निर्णय माहित झाल्याने काही दिवसांपासून विवेक नैराश्यग्रस्त असल्याचे त्याच्या कुटुंबीयाकडून कळाले.

रहाडे कुटुंबाच्या दुःखात शिवसंग्राम परिवार सहभागी आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी गेला आहे. मात्र आत्मबलिदान देणे हा पर्याय नसून समाजातील मुलामुलींनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या इतिहासात आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही तर तिच्यासाठी संघर्षच करावा लागला आहे. छत्रपती शिवरायांच्या शिकवणीप्रमाणे आपण एकोप्याने आरक्षणाची लढाई लढू अन पुन्हा जिंकूच मात्र आपल्या जीवाचे बरेवाईट करू नका, अशी हात जोडून विनंती देखील मेटे यांनी केली आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT