Abdul Sattars Handed Resignation Handed to Haribhau Bagdet Through Son
Abdul Sattars Handed Resignation Handed to Haribhau Bagdet Through Son 
छत्रपती संभाजीनगर

सत्तारांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या मुलाने हरिभाऊ बागडेंना गाठले फुलंब्रीत

नवनाथ इधाटे

फुलंब्री : कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेना प्रवेश निश्‍चित झाला होता. त्यामुळे सत्तार यांनी सकाळीच मुंबई गाठली. तत्पुर्वी त्यांनी आपल्या आमदारकीच्या राजीनाम्याचे पत्र सही करून आपले पुत्र समीर सत्तार यांच्याकडे दिले होते. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्या सोबत फुलंब्री तालुक्‍यातील गणोरी येथील कार्यक्रमात जाऊन या दोघांनी सत्तार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे देऊन तो मंजुर करून घेतला. एवढेच नाही तर दानवे यांनी बागडे यांचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिल्यावरच मातोश्रीवर अब्दुल सत्तार यांना शिवबंधन बांधण्यात आले. 

गेल्या चार पाच महिन्यापासून अब्दुल सत्तारांच्या पक्षांतराची चर्चा जिल्ह्यात रंगली होती. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असे वाटत असतांनाच अचनाक त्यांनी धनुष्यबाण हाती घेत सर्वांनाच आर्श्‍चयाचा धक्का दिला. शिवसेना प्रवेशासाठी हिरवा कंदील मिळाल्यामुळे सत्तार तातडीने मुंबईत गेले. पण त्यांच्या आमदारकीचा राजीनामा मंजुर झालेला नव्हता. ही जबादारी त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे आणि आपले पुत्र समीर सत्तार यांच्यावर सोपवली होती. 

त्यानूसार फुलंब्री तालुक्‍यातील गणोरी येथील बागडे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची त्यांनी भेट घेतली. कार्यक्रम संपल्यानंतर साधरणता बारा वाजता गणोरी गावातील रवींद्र गायकवाड यांच्या घरात हरिभाऊ बागडे यांनी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मंजूर केला. आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा सत्तारांचे पुत्र सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर व शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे विहित नमुन्यात घेऊन आले होते. त्यामुळे राजीनामा स्वीकारला असून मंजूर केल्याचे हरिभाऊ बागडे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT