छत्रपती संभाजीनगर

राज्यघटनेला सुरूंग लावण्याचे भाजपकडून प्रयत्न  : थोरात 

भास्कर बलखंडे

जालना :   भारतीय राज्यघटनेने देशातील  सर्वसामान्य  नागरिकाला हक्क ,अधिकार दिले आहेत,त्या राज्यघटनेलाच सुरूंग लावण्याचे प्रयत्न केंद्रातील भारतीय जनता पक्षाकडून जोरकसपणे सुरू आहेत.शेतकर्यांनाही पुरेशा प्रमाणात कर्ज वितरित केले गेले नाही,त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे.राज्यघटना वाचविण्यासाठी  आणि शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यसाठी सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेसचे  अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी  सोमवारी (ता.5) येथे केले.

श्री.थोरात यांच्या उपस्थितीत जालना जिल्हा कॅंा ग्रेस कार्यकर्ता मेळावा झाला.त्या मेळाव्यात श्री.थोरात बोलत होते.यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,यांच्यासह माजी आमदार कल्याण काळे, अनिल पटेल,शकुंतला शर्मा, धोंडिराम राठोड,माजी आमदार कैलास गोरंट्याल,भीमराव डोंगरे, कल्याण दळे,विलास आैताडे,राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख,,शेख महेमुद प्रा.सत्संग मुंडे यांच्यासह कॅांग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


मराठवाड्याच्या प्रश्नासाठी लढणार :  चव्हाण
माजी मुख्यमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यात पाऊस कमी असल्यामुळे दुष्काळी स्थिती गंभीर बनली आहे. शेंद्रा,चिखलठाणा येथील अनेक उद्योग बंद पडले असल्याने युवक बेरोजगार झाले आहेत.पावसाअभावी शेतकर्यांचे प्रश्नही  बिकट  आहेत.अशावेळी मुख्यमंत्री मात्र जनादेश यात्रेत फिरत असल्याचे टीका करून ते म्हणाले की पक्षावर निष्ठा नसलेले लोक पक्षाबाहेर पडत आहेत,त्यामुळे पक्षाचे शुध्दीकरणच होणार आहे.आयाराम गयाराममुळे पक्षांतरबंदी कायद्याला हरताळ फासल्या जात आहे.मराठवाड्याचे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढे खांद्याला खांदा लावून संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ देशमुख यांनी तर  शेख महेमुद यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT