Namita Mundada Enters BJP in Front of Pankaja Munde
Namita Mundada Enters BJP in Front of Pankaja Munde 
छत्रपती संभाजीनगर

पंकजा मुंडेच्या उपस्थितीत नमिता मुंदडांचा भाजप प्रवेश

दत्ता देशमुख

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीनाथगडावर (ता. परळी) येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रीमती मुंदडा यांना भाजप प्रवेश दिला. नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादीने केजमधून उमेदवारी जाहीर केली होती. 

येथून भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार आहेत. दरम्यान, मागच्या दहा दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर नमिता मुंदडा या राष्ट्रवादी सोडणार असे चित्र निर्माण झाले होते. अखेर सोमवारी सकाळी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आणि १२ वाजता त्यांचा भाजप प्रवेशही झाला. पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. 

नमिता मुंदडा यांच्यासह पती अक्षय मुंदडा व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यानंतर सर्वांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यामुळे आता केजमधून नमिता मुंदडा भाजपच्या उमेदवार असतील हे निश्चित झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT