Bhaskar Danve Seeking Support of Advocates for Santosh Danve
Bhaskar Danve Seeking Support of Advocates for Santosh Danve 
छत्रपती संभाजीनगर

पुतण्याच्या विकासकामांची साक्ष देत भास्कर दानवेंनी मिळवला वकील संघाचा पाठिंबा

तुषार पाटील

भोकरदन : पुतण्या संतोष दानवेंच्या प्रचाराला काका भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती भास्कर दानवे यांनी देखील कंबर कसली आहे. पुतण्याने केलेल्या विकासकामांची माहिती देत त्यांनी नुकतीच तालुका वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आमदार संतोष दानवे यांनी पाच वर्षात तालुक्‍यात व शहरात केलेल्या विकासकामांची एकप्रकारे साक्ष देत त्यांनी वकीलसंघाला पाठिंबा देण्याची गळ घातली.

भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार तथा जालना भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांचा प्रचार शिगेला पोचला आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती संतोष दानवे यांच्यासाठी मेहनत घेत आहे. यात त्यांचे काका भास्कर दानवेही मागे नाहीत. नुकतीच त्यांनी तालुका वकील संघांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विकासकामांचे पुरावे म्हणून शहरात सुरू असलेल्या 20 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे कॉंक्रेटीकरण, 7 कोटींचे नाट्यगृह, व्यायामशाळा, 1 कोटी रुपयांची अभ्यासिका आदींची उदाहरणे देत ही कामे थोड्याच दिवसात पुर्ण होऊन शहराचा कायापालट होणार असल्याची ग्वाही दिली.

पुतण्यासाठी केलेली शिष्टाई आणि विकासकामांची दिलेली साक्ष कामाला आली आणि भोकरदन तालुका वकिल संघाने संतोष दानवे यांना पाठींबा जाहीर केला. भास्कर दानवे यांनी यावेळी पेशवे नगर, देशमुख गल्ली, पोस्ट ऑफीस परिसर, प्रशाद गल्ली, तळेकर वाडी भाग्यनगर अशा विविध ठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन पुतण्यासाठी मतदारांना आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT