kendrekar-chavan
kendrekar-chavan 
छत्रपती संभाजीनगर

भाजप नेत्याच्या हस्तक्षेपाने सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी नियुक्ती रद्द ?

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो

मुंबई : औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदावर सुनील चव्हाण यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर ती लगोलग रद्दही करण्यात आली. मराठवाड्यातील एका मातब्बर भाजपच्या नेत्यामुळेच ही नियुक्ती रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त पदावर सुनील केंद्रेकर यांची झालेली नियुक्ती अशीच रद्द झाली होती. त्यावेळी सुद्धा याच मातब्बर नेत्याने हस्तक्षेप केला होता. सोयीचा अधिकारी नसेल तर हा मातब्बर नेता अधिका-यांच्या लगेच बदली घडवून आणतो, किंवा झालेली बदली रद्द करतो असे सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

पुढील वर्ष – दीड वर्षात लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने या बदल्या केल्याचे बोलले जात आहे. बदली करताना महत्वाचे अधिकारी पक्षासाठी सोयीस्कर असावेत असा सत्ताधारी पक्ष प्रयत्न करीत असतो.

परंतु काही मातब्बर नेते पक्षाच्या नावाखाली आपल्या खासगी कामांना पुरक व सोयीस्कर अधिकारी आहेत का हे पाहतात. सोयीस्कर नसलेले अधिकारी नेत्यांना नकोसे वाटतात. सुनील चव्हाण व सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती रद्द होण्यामागे हीच कारणे असल्याचे या सूत्रांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT