Atul Save Election Campaign
Atul Save Election Campaign 
छत्रपती संभाजीनगर

राज्यमंत्री होताच ५५ दिवसांत पाणीप्रश्‍नासाठी १६८० कोटींना मंजुरी- अतुल सावे

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : ''पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केल्याचे फळ राज्यमंत्री पदाच्या रुपाने मिळाले. या संधीचे सोने करत ५५ दिवसांतच शहरातील पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी १६८०  कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणली. रस्त्यांसाठी सव्वाशे कोटींचा निधी आणला, ज्यातून शहरातील रस्ते चांगले झाले. यापुढेही विकासासाठी सदैव तत्पर राहीन,'' अशी ग्वाही पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार व उमेदवार अतुल सावे यांनी येथे दिली.

ते म्हणाले, "गेल्यावेळी निवडून आलो, तेव्हा शहरातील रस्त्यांचा प्रश्‍न गंभीर होता. तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांना भेटून पाच रस्त्यासांठी 24 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. पण पाच रस्ते करून भागणार नव्हते. महापालिका सक्षम नसल्याने तत्कालीन महापौर घडामोडे यांच्यासह पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि शहरातील 31 रस्त्यांसाठी 100 कोटी रूपये मंजूर करून घेतले. एवढया मोठ्या प्रमाणात निधी आल्यामुळे आज शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत,"

''शहरात मुख्यतः गुंठेवारी भागात कुठलाच विकास होत नव्हता. महापालिकाही निधी खर्च करू शकत नव्हती. या संदर्भात प्रशासनासोबत बैठक घेतली. शहराचा 40 टक्‍के भाग गुंठेवारीत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून ड्रनेज, पथदिवे व रस्त्याचे कामे झालेली नव्हती. पण प्रशासकीय मान्यता घेऊन गुंठेवारी भागाचा देखील विकास केला. पाणी, रस्ते, गुठेंवारी भागाप्रमाणेच कचऱ्याचा प्रश्‍न देखील गंभीर झाला होता. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा धावा केला आणि हा प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला," असेही सावे म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT