bjp-mns workers quarrels at pankaja munde residence
bjp-mns workers quarrels at pankaja munde residence 
छत्रपती संभाजीनगर

पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी भाजप-मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 

सरकारनामा ब्युरो

परळी वैजनाथ : राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या चेअरमन प्रज्ञा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी भाजप व मनसेच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आंदोलनावरुन सोमवारी (ता.१७) हाणामारी झाली.

पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बीलासाठी कारखान्याच्या चेअरमन प्रज्ञा मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी  मनसे शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. 

या आंदोलनास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती पण मनसे या आंदोलनावर ठाम होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन कर्ते व भाजप कार्यकर्ते या कारणांमुळे एकमेकांना भिडले. यांच्यात हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT