छत्रपती संभाजीनगर

भाजपच्या रावसाहेब दानवे नावाच्या प्राण्याने मला पाडले : चंद्रकांत खैरे 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपने लोकसभेला आमच्या विरुद्ध भूमिका घेतली. भाजपच्या रावसाहेब दानवे नावाच्या प्राण्याने मला पाडले. या पराभवाचा बदला मी घेईन, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

रावसाहेब दानवे यांच्याविषयी बोलताना श्री. खैरे पुढे म्हणाले, रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जावयासाठी माझ्या विरुद्ध काम केले. तरी त्यांचा जावई लोकसभेला माझ्यापेक्षा 1 लाख मतांनी मागे राहिला. विधानसभेला तर रावसाहेब दानवेंचा जावई आम्ही गाडून टाकला, पराभूत केला. 

भाजपविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना श्री. खैरे म्हणाले, जुन्या मित्राने चूक केली. इतक्‍या वर्षांची मैत्री तोडली. पण बरे झाले त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांच्या लग्नालाही मी हजर होतो. 

बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना श्री. खैरे म्हणाले, बाळासाहेबांनी आम्हा सर्वांवर मुलासारखे प्रेम केले. शरद पवारसाहेबांनीही ते सांगितले आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा पट्टशिष्य होतो. उद्धव ठाकरे यांच्या लग्नालाही मी हजर होतो. लग्नानंतर मी साहेबांचे अभिनंदन केले तर ते म्हणाले, लग्न तर उद्धवचे झाले आहे, त्याचेच अभिनंदन कर. त्यावर मी त्यांना म्हणालो की, आपण कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालात म्हणून आपले अभिनंदन केले. अशा अनेक आठवणी आहेत. आज ते हवे होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT