CBI
CBI 
छत्रपती संभाजीनगर

सचिन अंदुरेची शस्त्रे लपविण्यास मदत केली म्हणून तिघांची एटीएस-  सीबीआय कडून चौकशी  

सरकारनामा

औरंगाबाद: डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकर आणि  सचिन अंदुरेला अटक केल्यानंतर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सीबीआय आणि एटीएसने औरंगाबाद येथे संयुक्त कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले . पोलिसांनी १ पिस्टल  आणि काही शस्त्रे ताब्यात घेतली आहेत .  

 कारवाईत दोन्ही पथकांनी तिघांना औरंगाबाद शहरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एका  संशयिताच्या घरातून तीन जिवंत काडतुस, पिस्टल,  तलवार आणि कट्यार जप्त केल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे.  मात्र, संशयित तिघांचा नेमका काय सहभाग होता हे अद्याप एटीएसने स्पष्ट केलेले नाही.  

सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास औरंगपुरा भागात असलेल्या एका घरात  सीबीआय आणि एटीएसचे अधिकारी, कर्मचारी गेले. त्यांनी अर्धा तास  कसून चौकशी केली. यानंतर पथकाने देवळाई भागात छापा मारून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले .

 दरम्यान, एटीएसच्या म्हणण्यानुसार त्यांनी या छाप्यात   मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे. दिवसभर ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी करण्यात आली आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT