save-khaire
save-khaire 
छत्रपती संभाजीनगर

अतुल सावेंच्या प्रचारात चंद्रकांत खैरेंनी झोकून दिले

सरकारनामा

औरंगाबादः पुर्व मतदारसंघात युतीच्या एकजुटीने पुन्हा एकदा "अतुलपर्व' येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत सावे यांनी प्रामाणिकपणे माझा प्रचार केला असे सांगणारे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सावेंच्या प्रचारासाठी धावून आल्याचे चित्र आहे.

सावेंच्या प्रचारात खैरेंनी स्वःताला झोकून दिल्यामुळे मतदारसंघातील शिवसेनेचे इतर पदाधिकारी देखील झपाट्याने कामाला लागल्याचे दिसते.

पुर्वचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने केलेली बंडखोरी, नंतर घेतलेली माघार याची कुठलीही कटुता किंवा नाराजी प्रचारात दिसत नाही. भाजप पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेकडून इच्छूक असलेले राजू वैद्य यांच्यासह शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी सावे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत.

लोकसभा निवडणुकीत पुर्वमधून एमआयएमच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती. ही वस्तुस्थिती असली तरी सावे यांनी युतीधर्म पाळत माझे प्रामाणिकपणे काम केले अशी शाबसकी चंद्रकांत खैरे यांनी दिली होती. आता त्याची परतफेड खैरे सावे यांच्या प्रचारात हिरारीने सहभागी होऊन करत आहेत.

युतीच्या एकजुटीचे दर्शन पुर्वमध्ये होत असल्याने मतदारांकडून सावे यांच्यासह प्रचारासाठी येणाऱ्या सगळ्याच नेते, पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत होत आहे. रांगोळीच्या माध्यमातून विजयी भव म्हणत शुभेच्छा असो, की मग सुहासिनींकडून औक्षण करून आशिर्वाद असे चित्र मतदारसंघात ठिकठिकाणी दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT