Khaire-Kshirsagar
Khaire-Kshirsagar 
छत्रपती संभाजीनगर

गद्दारांनी शिवसैनिकांना निष्ठा शिकवू नये :चंद्रकांत खैरे

दत्ता देशमुख

बीड : जयदत्त क्षीरसागरांसारखे नेतृत्व बीडकर यांना लाभले हे अभिमान वाटावा असे आहे. त्यांना विजयी करुन पुन्हा एकदा मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळवून द्यावे असे आवाहन करत बीड मधील काही गद्दार शिवसेना सोडून गेले आणि तेच शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला.

शिवसेना महायुतीचे बीडचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सभेत श्री. खैरे बोलत हाते. उमेदवार जयदत्त क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, दिलीप गोरे, नितीन धांडे, सुनील सुरवसे, सुनील अनभुले, अजय सवाई, संपदा गडकरी, संगीता चव्हाण, गोरख शिंगण, सागर बहीर, चंद्रकला बांगर उपस्थित होते.

 शिवसेना सोडून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असलेले  माजी मंत्री सुरेश नवले व माजी आमदार सुनिल धांडे सध्या राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. त्या दोघांनी जयदत्त अण्णांवर केलेल्या  टीकेचा  खैरेंनी चांगलाच समाचार घेतला. 

श्री. खैरे म्हणाले, सर्वच क्षेत्रातील मतदार जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी आहेत. ज्यांच्या कधीच निष्ठा नव्हती असे शिवसैनिक झाले होते तेच गद्दार आज राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांच्यासाठी शिवसैनिकांनी काठ्या लाठ्या खाल्ल्या, गावागावात दुश्मनी अंगावर ओढून घेतली, त्या गद्दारांनी पक्ष सोडला आणि आज हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. 

शिवसेनेने आमदार व मंत्री केलेले आता दुसऱ्यांचे गुणगान करत आहेत. मराठवाड्याच्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी जयदत्तअण्णा  सारखा लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात असणे गरजेचे आहे. जनतेच्या गरजा पूर्ण करणारे युतीचे सरकार असून जिकडे तिकडे सरकार येणार हीच चर्चा आहे. जनतेसाठी शासनाच्या योजना राबवणारे सरकार आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर सारखा नेता निवडून बीडकरांनी आपल्या लाल दिव्याची शान कायम ठेवावी आणि त्यांच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असेही खैरे म्हणाले.  

यावेळी जयदत्त क्षीरसागर, कुंडलिक खांडे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक दिलीप गोरे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT