vilasrao deshmukh
vilasrao deshmukh 
छत्रपती संभाजीनगर

लातूरच्या देशमुख कुटुंबाबद्दल मुख्यमंत्री ठाकरेंचा असाही जिव्हाळा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई: लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

याबाबत लातूर ग्रामीणचे तत्कालीन आमदार  त्रंबक श्रीरंगराव भिसे यांनी विनंती केली होती. त्याला अनुसरून वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून अहवाल मागविण्यात आला होता. आता लातूरच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे नाव “विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर” असे करण्यात येईल.

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुंबईमधील ईस्टर्न फ्री वे ला देखील विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT