Congress District President Distributing Food in Raosaheb Danve Constituency
Congress District President Distributing Food in Raosaheb Danve Constituency 
छत्रपती संभाजीनगर

रावसाहेब दानवे मंत्री ,पण लोकांच्या मदतीला धावले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देशमुख

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. उद्योग -धंदे ,व्यापार सर्वकाही ठप्प असल्यामुळे मोलमजुरी करून रोज पोटाची खळगी भरणाऱ्या शेकडो कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी विविध सामाजिक संस्था, संघटना, पुढारी गोरगरिबांच्या मदतीला धावून जात आहेत.

भाजपाचे खासदार तथा केंद्रीय अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन शहरात मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हेच लोकांच्या मदतीला धावून आल्याचे दिसले. रावसाहेब दानवे यांनी केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात मुबलक अन्नसाठा उपलब्ध असून तो दोन वर्ष पुरेल, असे सांगून वेळ मारून नेल्याचे बोलले जाते.

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी केंद्राकडूनच दिला जाणारा खासदार निधी व एक लाख रुपये मानधन देऊन दानवे यांनी वैयक्तिक अथवा थेट मदत करताना हात आखडता घेतल्याची चर्चा  आहे. तसेच त्यांचे पूत्र आमदार संतोष दानवे  हे सुद्धा सध्या कुठेच दिसत नसल्याची टीका होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी वैयक्तिक खर्चातून शहरातील अडीच हजार गोरगरीब मजूर व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गहू, तांदूळ ,साखर ,तेल ,तूप,शेंगदाणे मसाल्याचे पाकीट, साबण अशा सर्वच दैनंदिन आवश्यक वस्तूंचा या किटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राजाभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या किट तयार करण्याचे काम सुरू होते आज पासून प्रत्यक्षात गरजूंना या वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. गणपती परिवाराच्या वतीने नगरसेवक संतोष अन्नदाते, रमेश जाधव, रोशन देशमुख, पंजाबराव देशमुख, सोपान सपकाळ,भैरवनाथ तांबारे आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT