Mokshada Patil News
Mokshada Patil News Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

Cyber Fraud With Mokshada Patil: सायबर चोरट्यांचा थेट डॅशिंग महिला आयपीएस अधिकाऱ्यालाच गंडा, काय आहे प्रकरण?

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati SambhajiNagar News: सायबर चोरट्यांकडून सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक,महिलांना गंडा घातल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, चोरट्यांनी आता थेट एका महिला आयपीएस अधिकाऱ्यालाच लक्ष केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. एका सायबर भामट्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या नावे ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील (Mokshada Patil) यांच्या नावाने हे पैसे उकळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावानं एका सायबर भामट्याने ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडले होते. त्यानंतर या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट टाकली. सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे असा मेसेज केला.

उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वास ठेवून, देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत मोक्षदा पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट खाते बंद करण्यासाठी ट्विटरला रिपोर्ट करण्याबाबत कळविले. अनेक ठिकाणांवरून ट्विटरला रिपोर्ट गेल्यानंतर २७ मार्चला रात्री हे बनावट खाते बंद झाले. तसेच या प्रकरणी पैसे उकळणाऱ्याचा शोध सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT