Fadanvis-and-Danve.
Fadanvis-and-Danve. 
छत्रपती संभाजीनगर

मुख्यमंत्री म्हणाले, रावसाहेबांचे चिरंजीव म्हणजे बाप से बेटा सवाई !

तुषार पाटील

भोकरदन: रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत या मतदारसंघात मोठे विजय मिळवले आहेत, पण त्यांचे चिरंजीव संतोष पाटील हे म्हणजे 'बाप से बेटा सवाई'  आहेत. येणाऱ्या निवडणुकीत ते रावसाहेब दानवे यांचे सगळे रेकॉर्ड मोडतील असा मला विश्‍वास आहे , असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानदेश यात्रेत बोलताना सांगितले . 


महाजनादेश यात्रा आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात आणि मतदारसंघात होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संतोष दानवे हे सर्वात युवा आमदार आहेत. रावसाहेब दानवे यांनी अनेक रेकॉर्ड केले, पण त्यांचा रेकॉर्ड मोडण्याची धमक ही फक्त एकाच माणसात आहे, ते म्हणजे आमदार संतोष दानवे. त्यांना तुम्ही विक्रमी मतांनी निवडून देणार अशी मला आशा आहे, आणि ते किती मतांनी निवडून  येतील हे विचारण्यासाठी मी या जनादेश यात्रेच्या निमित्ताने आलो आहे. 

भोकरदनमध्ये महाजनादेश यात्रा आली तेव्हा मला काहीजणांनी प्रश्‍न विचारला की, भोकरदन तर रावसाहेब दानवे यांचा गड आहे. इथून भाजपचा उमेदवार निश्‍चित निवडून  येणार आहे. मग यात्रा काढण्याची काय गरज? यावर मी उत्तर दिले,भोकरदनमधील सभा माझ्यासाठी शुभ ठरत आली आहे. 2014 मध्ये मी इथे सभा घेतली आणि आम्ही राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता घालवली. आता पुन्हा एकदा त्यांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी भोकरदनमध्ये सभा घ्यायला आलो आहे , असेही  फडणवीस यांनी सांगितले. 

भाजप उमेदवारांच्या पाठीशी आपले आशिर्वाद कायम राहू द्या असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आमदार संतोष दानवे यांच्या वतीने या सभेत कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश, तसेच रामेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे देखील मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT