dongaonkar-Munde
dongaonkar-Munde 
छत्रपती संभाजीनगर

ना निमंत्रण पत्रिकेवर नाव ना व्यासपीठावर स्थान , डोणगांवकर नाराज

जगदीश पानसरे

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या होणाऱ्या राज्य स्तरीय सक्षम महिला मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवर जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. देवयानी डोणगांवकर यांचे नाव छापण्यात आलेले नाही. शिवाय व्यासपीठावर देखील त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. 

आपली नाराजी त्यांनी राज्याच्या महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व्यक्त केली आहे. राजशिष्टाचारानूसार निमंत्रण पत्रिकेवर नाव असणे गरजेचे होते, तसेच व्यासपीठावर माझी आसन व्यवस्था करावी असे डोणगांवकर यांनी पंकजा यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिीत उद्या (ता.7) शेंद्रा एमआयडीसी येथे ऑरिक हॉलचे उद्घाटन आणि ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  परंतु या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ऍड. देवयानी डोणगांवकर यांचे नाव छापण्यात आलेले नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात महिलांचा मेळावा आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महिला विराजमान असतांना निमंत्रण पत्रिकेवर नामोल्लेख आणि व्यासपीठावर स्थान न देण्यात आल्यामुळे देवयानी डोणगांवकर प्रचंड नाराज झाल्या आहेत.

आपली नाराजी त्यांनी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांना भेटून व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी पत्रिकेत राजशिष्टाचारानूसार आपला नामोल्लेख असणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. शिवाय आपली आसन व्यवस्था व्यासपीठावर करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी मागणी देखील केली आहे.

 यावर निमंत्रण पत्रिकेतील नावे आणि व्यासपीठावरील आसन व्यवस्था पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलनूसार करण्यात आल्याचे पंकजा मुंडे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT