Ambadas Danve  Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर

गद्दारांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये : दानवेंची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

Ambadas Danave : मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये येऊन मनोरंजन करून गेले, अशी टीका दानवेंनी केली.

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : काल औरंगाबाद येथील पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती.आता मुख्यमंत्री शिंदेनी केलेल्या टिकेचा जोरदार समाचार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये येऊन मनोरंजन करून गेले, अशी टीका दानवे यांनी केला.

अंबादास दानवे म्हणाले, १९९३ साली मुंबईत दंगल झाली तेव्हा शिवसेनेनेच मुंबई वाचवली, बाबरी मशीद पाडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच जाहीरपणे घेतली होती. त्यामुळे शिवसेनेविषयी बोलण्याचा आणि ती फोडण्याचं पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केलं, त्या गद्दारांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याचं पाप तुम्ही करताय आणि आज जाहीर सभेत ते तुम्ही कबूल केलं. ज्या पद्धतीने दिल्लीकरांपुढे झुकून महाराष्ट्राचा अपमान करत आहात. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली ते जर तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखलाभ होवो, असा घणाघात दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठवाड्यात येऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास विसरले विकासाबाबत एक शब्दही त्यांनी काढला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मराठवाड्याच्या विकासाला छेद देण्याच काम करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. सामना वर्तमानपत्रातील अग्रलेख व बातमी यांची देशपातळीवर दखल घेतली जाते. सामनामध्ये आलेल्या बातमीने भल्याभल्यांची वाट लावली जाते, असेही दानवे यांनी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT