Dr. Bhagwat Karad has Seventeen Crores Wealth 
छत्रपती संभाजीनगर

भाजपचे डॉ. भागवत कराड 17 कोटींच्या संपत्तीचे मालक

भाजपचे डॉ. भागवत किसनराव कराड यांनी नुकताच राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेची माहिती दिली आहे

सरकारनामा ब्युरो

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार डॉ. भागवत किसनराव कराड हे औरंगाबाद शहरातील प्रसिध्द वैद्यकीय व्यवसायिक आहेत. त्यांचे स्वतःचे रुग्णालय असून ते 17.58 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याविरोधात न्यायालयात तसेच पोलिसांकडे कोणताही गुन्हेगारी खटला नाही.

भाजपचे डॉ. भागवत किसनराव कराड यांनी नुकताच राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत सादर केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे केवळ एक 11.43 लाखांची ह्युंदाई व्हर्ना कार आहे. डॉ. कराड यांनी मराठवाडा विद्यापीठातून 1976 मध्ये एमबीबीएस आणि 1981 मध्ये एम. एस. जनरल सर्जरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना 1991 मध्ये मुंबई फिजीशीयन महाविद्यालयाची फेलोशीप मिळाली आहे. ते स्वतः व पत्नी डॉ. अंजली दोघेही डॉक्‍टर आहेत.

औरंगाबाद शहरात त्यांचे 4,762 चौरस फुट क्षेत्र असलेले रुग्णालय आहे. यातील पहिला व दुसरा मजला पत्नी डॉ. अंजली कराड यांच्या मालकीचा आहे. तिसऱ्या मजल्यावर त्यांचे निवासस्थान आहे. या इमारतीचे सध्याचे एकत्रीत बाजारमुल्य 8.29 कोटी रुपये आहे. त्यांनी देवगिरी नागरी सहकारी बॅंकेकडून 70 लाखांचे तर पत्नी डॉ. अंजली यांनी देवगिरी नागरी बॅंकेचे 96.60 लाख, स्टेट बॅंक हैद्राबादचे 1.58 कोटींचे गृहकर्ज घेतले आहे. याशिवाय त्यांनी संजयकुमार चाटे, हर्षवर्धन कराड, विकास कराड यांच्याकडून त्यांनी हातउसनवार तसेच पत्नीनेही हातउसनवार घेतलेले कर्ज व बॅंकांचे असे एकत्रीत डॉ. कराड यांचे 1.60 कोटी आणि पत्नीचे 3.08 असे एकत्रीत 4.68 कोटींचे कर्ज आहे.

डॉ, कराडे यांची इत्तवा (ता. गंगापूर) येथे 2.30 एकर जमीन आहे. पत्नीची औरंगाबाद जिल्ह्यात आडगाव, सातारा, जाधववाडी येथे प्रत्येकी एक तर निपाणी येथे तीन अशा सहा ठिकाणी शेतजमीनी व निवासी भुखंड आहेत. त्याचे एकत्रीत बाजार मूल्य 9.29 कोटी रुपये आहे. डॉ. कराड यांच्याकडे 2.45 लाख आणि पत्नीकडे 6.05 लाखांची रोख रक्कम आहे. त्यांनी विविध बॅंका, कंपन्यांतील 3.25 कोटींची गुंतवणुक केलेली आहे.

डाॅ. भागवत कराड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT