fight against corona meghna bordikar requestes people to go home
fight against corona meghna bordikar requestes people to go home 
छत्रपती संभाजीनगर

हात जोडून आमदार मेघना बोर्डिकरांची जिंतूरकरांना भावनिक साद, `बाबांनो घरी जा'

गणेश पांडे

परभणी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी स्वतः stay at home राहून स्वतःची काळजी घ्या असे आवाहन मतदारसंघातील नागरिकांना केले होते. परंतु लोक ऐकत नसल्याने अखेर आमदार मेघना यांना लोकांना समजून सांगण्यासाठी स्वतःचा stay at home भंग करावा लागला. चक्क लोकांच्या समोर हात जोडून बाबांनो घरी जा असे भावनिक साद घालावी लागली.

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका असताना ही जिंतूर (जि. परभणी) येथील लोक गावात फिरत असल्याचे कळताच जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना स्वतः घरा बाहेर पडावे लागले. रस्त्यावरची गर्दी कमी करणे व सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन त्यांना करावे लागले.

कोरोना महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनासह, सामाजिक कार्यकर्ते यांनी गर्दी टाळण्या-संदर्भात वारंवार सुचना करूनसुद्धा जिंतूर शहरातील रस्त्यावर , भाजी मंडई, किराणा आदी ठिकाणी गर्दी कमी होत नव्हती. सोशल डिस्टंन्सचा नियम कोणी पाळीत नसल्याचे चित्र शहरात लाॅक डाऊनच्या सहावेदिवशी  देखील दिसले.हि बाब अतिशय गंभीर असल्याने आमदार मेघना बोर्डीकर यांनी सकाळी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत सोनुने यांची यासंदर्भात बैठक घेतली. 

पोलिस निरीक्षकासह त्या थेट भाजी मार्केट व बाजार पेठेतील रस्त्यावर पोहचल्या. त्यावेळी शहरातील गर्दी पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लोकांच्या निदर्शनास आणून देत स्वत: सोबतच आपले कुटुंब,गाव तसेच देशाच्या आरोग्यासाठी गर्दी टाळण्याचे, भाजी,किराणा,औषधी विक्रेत्यां कडून गरजेच्या वस्तू खरेदी करताना ठरवून- दिलेले एकमेकांमधील अंतर पाळण्याचे आवाहन केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT