जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू नवघरे यांनी रविवारी (ता. २२) घरीच थांबून पुस्‍तकांचे वाचन केले.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू नवघरे यांनी रविवारी (ता. २२) घरीच थांबून पुस्‍तकांचे वाचन केले. 
छत्रपती संभाजीनगर

आमदार राजू नवघरे यांनी वाचन करून पाळला रविवारचा जनता कर्फ्यू

पंजाब नवघरे

वसमत : जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू नवघरे यांनी रविवारी (ता. २२) घरीच थांबून भारतीय संविधान, छत्रपती शिवाजी महाराज, शरद पवार यांचे आत्‍मचरित्र या पुस्‍तकांचे वाचन केले. तसेच त्‍यांच्या पत्‍नी वर्षा, मुलगा श्रीनिवास, मुलगी गौरी यांनीदेखील विविध लेखकांच्या पुस्‍तकांचे वाचन करत कॅरम खेळला.

आमदार राजू नवघरे यांनी मतदारसंघात कोरोना विषाणूबाबत जनजागृती केली. मागील आठ दिवसांपूर्वीच गावोगाव जनजागृतीचे बॅनर, पोस्‍टर लावण्यात आले होते. त्‍यावर कोरोना बाबतच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली होती. या संदर्भात संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शनिवारी (ता. २१) शहरातील उपजिल्‍हा व महिला रुग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्‍यांना सूचना दिल्या. 

वसमत मतदारसंघात मुंबई, पुणे, कोलकात्ता, बैंगलुरू, हैदराबाद येथून कंपनीत काम करणारे कर्मचारी, अधिकारी जवळपास १४०० ते १६०० आलेले आहेत. त्‍यांची माहिती घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यास सांगितले. शहरासह ग्रामीण भागात जनजागृतीसाठी वाहनावर स्‍पीकर लावून कोरोना विषाणूची व जनता कर्फ्यूची माहिती दिली. 

प्रत्‍येक कार्यकर्त्यांना वसमत येथे न येता आपापल्या घरीच राहण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. गावातदेखील एकत्रित न बसता कुटुंबीयांसोबत थांबावे, असे आवाहन त्‍यांनी केले होते. सोशल मीडियावरदेखील त्‍यांनी पोस्‍ट टाकून मी कुटुंबीयांसोबत आहे, तुम्‍हीदेखील घरीच थांबा, अशा सूचना दिल्या होत्या.

उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार ज्‍योती पवार यांच्या बैठका घेऊन मतदारसंघात बाहेरून येणारे नागरिक यांच्यावर नजर ठेवून त्‍यांचा शोध घ्यावा, त्‍यांच्या आरोग्याची तपासणी करावी, असे सांगितले.

दरम्यान, रविवारी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वसमत येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वनागरिक घरातच होते. आमदार राजू नवघरे यांनीही घरीच राहणे पसंत केले. दिवसभर घरात बसून विविध पुस्तकांचे वाचन केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT