Funny Moments Being Created dut to Corona
Funny Moments Being Created dut to Corona 
छत्रपती संभाजीनगर

पुण्याची ब्याद आमच्याकडे कशाला? कुठे वाद तर कुठे गंमतीजमती..

कृष्णा पिंगळे

सोनपेठ : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संशयितांची संख्या पाहता आपल्या गावी येणार्‍यांची गर्दी वाढली आहे  कुणी नोकरीसाठी  तर कुणी शिक्षणानिमित्त  मोठ्या शहरात  गेलेले आहेत  कोणामुळे सहाजिकच त्यांच्या  पालकांची  काळजी वाढली आहे अशा वेळी कोणत्याही परिस्थितीत  आपले मूल घरी असावे, असे वाटणे साहजिक आहे. तर दुसरीकडे  मुंबई-पुण्याची ब्याद आपल्या गावात नको, अशी भूमिका घेत  अनेकांनी बाहेरून येणाऱ्यांना मज्जाव केल्याचे  चित्र  आहे यातून कुठे वाद, तर कुठे गमतीजमती घडताना दिसतात

सोनपेठ शहरातील एका व्यक्तीचा मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी होता. त्याला घ्यायला गेलेल्या वडिलांनी मुलाला थेट घरी न नेता आधी दवाखान्यात नेले. डॉक्टरांना सांगितले की, माझा मुलगा पुण्यावरून आलेला आहे, याची तपासणी करावी व त्यास कोरोनाची लागण असेल तर  शासकीय रुग्णालयात दाखल करू. 'पुण्याची बला सोनपेठमध्ये कशाला'? असे लोक म्हणतात असे त्या व्यक्तीने सांगितले, तेव्हा सर्वानाच हसू आवरले नाही.

पुण्यातून गाडी येताच पळापळ

तालुक्यातील एका खेड्यात पुण्यावरून ओला उबेरचे चालक आल्याची बातमी कळताच एकच पळापळ सुरू झाली. अनेकांनी आपल्या कुटूंबियांना घरात बंद करून बाहेरून कुलूप लावण्याचे प्रकारही घडले. गावात आलेल्या पुणेकर मंडळींना आपल्या घरापासून दूरच राहण्याचा दमच गावकरी भरत आहेत. जनता कर्फ्युच्या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानातून औषध फवारणार असल्याची अफवा पसरल्याने अनेकांनी घराबाहेर पाऊल सुद्धा टाकले नाही. घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना घरात बसा नाही, तर अंगावर औषध पडेल म्हणून आपल्या घरात बोलावून घेतले जात होते.

ग्रामीण भागातील एका गावात पुण्यावरून पन्नासहून अधिक नागरिक आल्याने त्या गावात मोठा वादाचा प्रसंग उद्भवला. पुण्यावरून आलेल्या नागरिकांना गावात प्रवेश देण्यावरूनच विरोध दर्शवण्यात आला. त्यावरून त्या गावातील आलेल्या नागरिकांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. 

परंतु संबधित नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर हा वाद मिटला. दरम्यान, बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती देणारे फोन आरोग्य विभागातील अधिकारी तसेच प्रशासनासह पोलिसांना केले जात आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT