Ganeshrao Doodhgaonkar
Ganeshrao Doodhgaonkar 
छत्रपती संभाजीनगर

 गणेशराव दुधगावकर  यांची सशर्त जामीनावर सुटका

सरकारनामा

परभणी : एका संस्थेच्या भुखंड प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी खासदार गणेशराव दुधगावकर आणि तत्कालीन तलाठी दत्तात्रय कदम या दोघांची दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप कश्यप यांनी मंगळवारी सशर्त जामीनावर सुटका केली आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

संस्थेच्या भुखंड प्रकरणी माजी खासदार गणेशराव दुधगावकर आणि तत्कालीन तलाठी दत्तात्रय कदम या दोघांना नानलपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी  कोर्टाने दिली होती. 

या दोघांचीही न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर तपास पूर्ण झाला आहे. जामीन मिळावा, यासाठी न्यायालयास या दोघांच्या वतीने अर्जाद्वारे मागणी करण्यात आला होता. या  प्रकरणी मंगळवारी सुनावणी पूर्ण होऊन गणेशराव दुधगावकर आणि डी.एस. कदम यांची सशर्त जामीनावर मुक्तता न्या. दिलीप कश्यप यांनी केली. 

याबाबत अधिक माहिती अशी, येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील 135 कर्मचाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सर्वे नंबर 613 मध्ये 16 एकर 8 गुंठे जमीन घेतली होती. ही जमीन मुख्यप्रवर्तक नारायण माधवराव बुलंगे यांच्या नावे खरेदी केली होती.

त्यानंतर माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर व महसूल विभागातील तलाठी डी.एस.कदम यांनी महसुल दप्तरी बनावट व खोटे फेरफार नोंदवून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या नावे करून दिली. 

या प्रकरणी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. सोळूंके यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्यासह महसुल विभागातील दत्तात्रय श्रीरंग कदम, निवृत्त तलाठी रावसाहेब भागुजी पाटील, निवृत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसिलदार वि.गो.गायकवाड, निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्या विरुध्द ता. 16 डिसेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. 

या प्रकरणात माजी खासदार गणेशराव दुधगावकर आणि तत्कालीन तलाठी दत्तात्रय कदम या दोघांना अटक करण्यात आली होती . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT