Haribhau Bagde_Chandrakant_Khaire
Haribhau Bagde_Chandrakant_Khaire 
छत्रपती संभाजीनगर

चंद्रकांत खैरेंच्या पराभवाची कारणे हरिभाऊ बागडे समोर आणतील ?

माधव इतबारे

औरंगाबाद :  लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला महापालिका एक कारण असू शकते. पण इतर कारणे आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे समोर आणतील, असा टोला महापौर नंदकुमार घोडेले यांनी लगावला आहे. 

महापौर भरपूर काम करतात, पण नागरिक समाधानी नाहीत, त्यांनी आणखी कामे करण्याची गरज असल्याच चिमटा बागडे यांनी बुधवारी दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत बसपोर्ट भूमिपूजनाच्या कार्यक्रमात काढला होता. 

या संदर्भात पत्रकारांनी आज महापौर घोडेले यांना छेडले असता ते म्हणाले, हरिभाऊ बागडे माझ्यासाठी आदरणीय व्यक्ती आहेत. खैरे यांच्या पराभवाविषयी त्यांची तळमळ काल दिसून आली. ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून, लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यास त्यांनी सुरवात केल्याचे दिसून येत आहे. खैरे यांच्या पराभवासाठी महापालिका एक कारण असू शकते, पण त्यासाठी इतरही अनेक कारणे आहेत. बागडे लवकरच ती जनतेसमोर आणतील अशी मला आशा आहे. 

महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती आहे. त्यामुळे काही कामे झाली नसतील तर त्याला मला एकट्याला जबाबदार कसे धरता येईल? असा प्रश्‍न त्यांनी केला. शिवसेना पुढे जाणारा पक्ष आहे. पराभवाची कारणे शोधत न बसता आम्ही पुढे निघालो आहोत, असेही महापौरांनी यावेळी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT