Khaire-Jadhav
Khaire-Jadhav 
छत्रपती संभाजीनगर

तुमचे हिंदुत्व बेगडी, माझ्यावर पराभवाचे खापर का फोडता ? हर्षवर्धन जाधव 

जगदीश पानसरे

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा निसटता झालेला पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे.  यातून खैरे यांच्या पराभावाला जबाबदार ठरलेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. 

 हर्षवर्धन जाधव फितूर आहेत ,  गद्दार आहेत अशा प्रकारचे आरोप आणि टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे. या टीकेला सोशल मीडियावर हर्षवर्धन जाधव यांनी आज उत्तर देताना शिवसेनेच्या हिंदुत्वालाच आव्हान दिले आहे. 

"शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी असून त्यांनी पराभवाचे खापर माझ्या माथी फोडू नये," असा टोला हर्षवर्धन जाधव यांनी लगावला आहे.  मालेगाव नगरपालिकेमध्ये एमआयएमच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या शिवसेनेने औरंगाबादेत देखील जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी केलेली आहे, असेही ते म्हणाले . 

 "आपल्या सोयीनुसार हिंदुत्व आणि हिंदूंचा वापर करणाऱ्या शिवसेनेला माझ्यामुळे औरंगाबादेत रजाकारी आली किंवा शिवसेनेचा पराभव झाला हा आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. घटनेने प्रत्येकाला या देशात निवडणूक लढविण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करतच मी लोकसभेची निवडणूक लढलो. त्यामुळे शिवसेनेने माझ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण करावे ,"असा सल्ला जाधव यांनी शिवसेनेला दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT