छत्रपती संभाजीनगर

रासपा ५७ जागांची मागणी करणार : महादेव जानकर यांची माहिती

मंगेश शेवाळकर

हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष ५७ जागांची मागणी करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी (ता.१९) 'सरकारनामा'शी बोलताना दिली आहे. येथील शासकीय विश्रामगृहात जानकर यांनी संवाद साधला. यावेळी रासपाचे प्रदेश पदाधिकारी विनायक भिसे  पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

जानकर म्हणाले, "राज्यात चांदा ते बांदा पर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी ताकद निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीत आमचे सहा जिल्हा परिषद सदस्य असतांना विधानसभेच्या चार जागा दिल्या होत्या. मात्र आता रासपाचे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत आम्ही ५७ जागांची मागणी करणार आहोत. मराठवाडयात प्रत्‍येक जिल्‍ह्‍यातून किमान एक विधानसभेची जागा रासपला सोडवून घेण्याबाबत आग्रह असणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा रासप घटक पक्ष आहे. आतापर्यंत जागा वाटपासंदर्भात भाजप व शिवसेनेसोबत दोन बैठका झाल्‍या आहेत. काही दिवसात तिसरी बैठक होणार आहे.'' ज्या ठिकाणी पक्षाची ताकद मोठी आहे. त्या ठिकाणच्या जागा रासपला सोडण्यासाठी आम्ही आग्रही असणार असल्याचे त्यांनी स्‍पष्ट केले.

मुंबई येथे ता. २५ ऑगस्‍ट रोजी शिवाजी पार्क येथे रासपचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास राज्‍यभरातून सुमारे दहा लाख पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येणार असून पक्षाची ताकद दाखवून दिली जाणार आहे. या मेळाव्यानंतरच शिवसेना व भाजप नेत्‍यासोबत बैठक होवून जागा वाटपाचा निर्णय होणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले. रासपची ५७ जागांची मागणी असली तरी बैठकीत काही जागा कमी जास्‍त होवू शकतात असेही जानकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT