husain dalwai on udhhav thackrey
husain dalwai on udhhav thackrey  
छत्रपती संभाजीनगर

मुस्लिमांशिवाय विकास शक्‍य नाही याची उध्दव ठाकरेंना जाणीव!

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार या राज्याला पुन्हा एकदा नंबर एकवर आणल्याशिवाय राहणार नाही. फडणवीस सरकारच्या काळात विकासाची गती खुंटली होती, त्याला आता वेग येईल. राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर साडेअकरा टक्के मुस्लिम समाजाला दुर्लक्षित करून ते शक्‍य नाही याची जाणी उध्दव ठाकरे यांना असल्याचे मत कॉंग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना दलवाई यांनी विविध मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका अतिशय चांगली आहे. अमूक एक समाज अशादृष्टिने ते पाहत नाहीत. अडचणी दूर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

मुस्लिम समाज शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. तत्कालीन आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण आता हे सरकार देईल, असा विश्‍वास देखील दलवाई यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने 2014 मध्येच कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापनेसाठीचा प्रस्ताव दिला होता या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेकडून अशी ऑफर आली होती की नाही, हे मला माहित नाही, परंतू, अशी ऑफर आली होती तर ती स्वीकारली का गेली नाही? याचे मला वाईट वाटते असा चिमटा देखील दलवाई यांनी यावेळी काढला. तेव्हाच या ऑफरचा गांभिर्याने विचार केला असता तर आज संपूर्ण देशातील चित्र वेगळे असते. आज जे वातावरण तयार झाले आहे, ते झालेच नसते, महाराष्ट्राचीही अधोगती झाली नसती असा टोला दलवाई यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT