भाजपचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी गोपीनाथगडाला भेट देऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
भाजपचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी गोपीनाथगडाला भेट देऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 
छत्रपती संभाजीनगर

गोपीनाथराव मुंडेंच्या आशीर्वादामुळेच राज्यसभेत : खासदार डॉ. भागवत कराड

सरकारनामा ब्युरो

बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी मला प्राप्त झाली. यापूर्वीही त्यांच्यामुळेच औरंगाबादचे महापौरपद मला भूषविता आले, अशी कतृज्ञता भाजपचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली.

राज्यसभेत जाण्याचा मान ही आयुष्यातील फार मोठी संधी आहे. या माध्यमातून मराठवाड्यातील जनतेच्या हितासाठी व मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.

गोपीनाथराव मुंडे यांनी राजकीय आणि सामाजिक आदर्श जीवनाचा जो रास्ता निर्माण केला आहे त्याच रस्त्यावरून सर्वसामान्यांच्या सोबतीने प्रवास करून जनहिताची कार्य करणार आहे असेही ते म्हणाले.

राज्यसभेवर अविरोध निवडीनंतर खासदार डॉ. भागवत कराड मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या परळीजवळील गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान, त्यांनी माजलगावला मोहन जगताप यांच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच त्यानंतर बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संघर्षयोद्धा कार्यालयाला आणि माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या अटल जनसेवक कार्यालयाही भेट दिली. त्यांचा यावेळी जंगी सत्कार करण्यात आला.

त्यांच्या समवेत महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्ष प्रविण घुगे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश पोकळे, आदीनाथ नवले, माजी महापौर बापू घडामोडे, नवनाथ शिराळे, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, भारत काळे, तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, अल्पसंख्यांक आघाडीचे सलिम जहांगिर, राजेंद्र बांगर, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, चंद्रकांत फड, प्रा. डॉ. देविदास नागरगोजे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभय वनवे आदींसह भाजप कार्यकर्ते होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT