i celebrate my birthday by helping poor says kailas gorantyal
i celebrate my birthday by helping poor says kailas gorantyal 
छत्रपती संभाजीनगर

गरिबांना मदत करून माझा वाढदिवस साजरा- कैलास  गोरंट्याल

महेश गायकवाड

जालनाः  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 एप्रिल रोजी  माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सर्व नगरसेवक,  काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गरीब मजूर, कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, असे आवाहन आमदार  कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक शुभेच्छाही स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले असून कुणीही पुष्पगुच्छ, हार आणण्याचा प्रयत्न करु नये. असे आवाहनही त्यांनी केले आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक, विविध व्यावसायिक तसेच हितचिंतक  सामाजिक उपक्रम राबवतात.

यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे   जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून  शासनाने 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.  या पार्श्वभूमीवर आमदार गोरंट्याल यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 वाढदिवसाच्या कार्यक्रमावर अनावश्यक खर्च न करता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,  आणि नगरसेवकांनी लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे ज्यांच्यावर उपासमारीचे वेळ आली आहे.  अशा मजूर आणि गरीब कुटुंबांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, असे आवाहन गोरंट्याल यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT