Pankaja munde reaction news
Pankaja munde reaction news 
छत्रपती संभाजीनगर

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वोत्तपरी योगदान देईन...

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः देशाचे पंतप्रधान आणि आमचे नेते नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली, याबद्दल मी या सगळ्यांची आभारी आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, दिलेल्या संधीचे निश्चितच सोनं करीन. भविष्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वोत्तपरी योगदान देण्याचा माझा निश्चय असल्याचे मत भाजपच्या माजी मंत्री व नुकतीच राष्ट्रीय सचिवपदी निवड झालेल्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज सायंकाळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची निवड जाहीर केली. यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले असून त्यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मिडियावरून प्रतिक्रिया व्यक्त करत आनंद व्यक्त केला. तसेच दिल्लीतील नेत्यांचे आभारही मानले. पंकजा मुंडे म्हणाल्या, थोड्यावेळा पुर्वीच माझी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाल्याचे कळाले. माझ्यावर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांकडून अभिनंदनाचे फोन येत आहेत, शुभेच्छांचा वर्षाव चोहोबाजूंनी होत आहे. कार्यकर्त्यांच्या आनंदातच माझाही आनंद आहे.

महिलांना झुकते माप..

नवीन कार्यकारिणीत नड्डा यांनी तरुण आणि महिलांना अधिक झुकते माप दिले आहे. नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या नवीन कार्यकारिणीची प्रतीक्षा होती. अखेर आठ महिन्यांनी ही प्रतीक्षा संपली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. कायम चर्चेत असणारे युवा नेते तेजस्वी सूर्या यांना युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर डॉ. रमणसिंह, बैजयंत जय पांडा, अन्नापूर्णा देवी यांनी  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.  

महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे, पूनम महाजन आणि शाम जाजू यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. याचवेळी राष्ट्रीय सचिवपदी महाराष्ट्रातील विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी एनटीआर यांच्या कन्या पुरंदेश्वरी यांना संधी देण्यात आली आहे. याचवेळी राम माधव, मुरलीधर राव आणि अनिल जैन यांच्याकडील सरचिटणीसपद काढून घेण्यात आले आहे. अकाली दलाने भाजपची साथ सोडल्याने पंजाबमधील तरुण चुग यांना सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT