jaydatta Kshirsagar
jaydatta Kshirsagar  
छत्रपती संभाजीनगर

मी खचलो नाही, मी पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेईन : जयदत्त क्षीरसागर

दत्ता देशमुख

बीड : जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. पराभवाची कारण मीमांसा शोधू. असे हताश होऊ नका, मी खचलो नाही, तुम्हीही खचू नका, नव्या जोमाने कामाला लागू. अनेक पराभव मी पाहिले आहेत, पचवले आहेत, एक पराभव हा अल्प विराम असतो तो पूर्ण विराम ठरणार नाही, पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊ असा आशावाद व्यक्त करत जयदत्त क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.


राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा बीड मतदार संघातून निसटता पराभव झाला. निकालानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांत अन शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. पराभवानंतरही त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी गर्दी केली होती. त्यानंतर शुक्रवारी जयदत्त क्षीरसागर लोकांसमोर आले.


  जयदत्त क्षीरसागर म्हणाले, केंद्रात आणि राज्यात एका विचाराचे सरकार आहे. विकासाचा वेग मंदावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पराभव आपण स्वीकारत असून पराभवाला अनेक कारणे असतील. शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी अपार कष्ट आणि मेहनत घेतली असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले. चाळीस वर्षाच्या राजकरणात अनेक पराभव पाहिले, ते पचवले, एका पराभवाने सगळे संपले असे नसते, हा अल्प विराम आहे, पूर्ण विराम नाही, ढग निघून जात असतात, मी खचलो नाही, अन खचणार नाही, तुम्ही ही खचू नका, असा धीर त्यांनी समर्थकांना दिला . 


 जिल्ह्याच्या भल्यासाठी नव्या उमेदीने कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, किशोर काळे, वैजीनाथ तांदळे यांनीही भावना व्यक्त केल्या.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT