if people order me about fight then i will be take decision aditya thackrey 
छत्रपती संभाजीनगर

लोकांनी लढ म्हटले तर माझा विधानसभा लढवण्याचा निर्णय : आदित्य ठाकरे   

मधुकर कांबळे

औरंगाबाद : कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, मात्र लोकांनी लढ म्हटले तरच त्यांचा आदेश घेउनच आपण निर्णय घेणार असल्याचे युवासेना प्रमूख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद येथे  स्पष्ट केले. 

आदित्य यांनी विधानसभेची निवडणुक लढवण्यासाठी वरळीसह अन्य दोन ठिकाणाहून कार्यकर्त्यांनी अग्रह धरला आहे.

जन आशिर्वाद यात्रेचा आज तिसरा टप्पा पूर्ण झाला असून यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागात ही यात्रा गेली. 

76 तालुक्‍यात 4 हजाराहून अधिक किलोमीटर जन आशिर्वाद यात्रा फिरुन आली आहे. गावांमध्ये जाउन, रस्त्यावर भेटणारी माणसे सर्वांना भेटून त्यांची मते, त्यांचे प्रश्‍न जाणून घेत आहे. लोक अडचणी सांगत आहेत , निवेदने देत आहेत. ही यात्रा राज्यात फिरत राहील यानंतर कोकण, पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाणार आहे,

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, ठाणे पालघरमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मला शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागदेखील आवडतो. वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्‍त केली आहे.

 त्यापुर्वीही दिग्रस आणि मालेगाव मतदारसंघातून मी विधानसभा लढवावी अशी तिथल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्‍त केली आहे. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने मतदारांचे आभार मानत असताना, त्यांची मने जिंकत असताना मी विधानसभा निवडणूक लढली पाहीजे किंवा नाही याविषयी जनतेची मते जाणून घेत आहे. लोकांचा आदेश घेउनच मी पुढे जाणार आहे. लोकांनी लढ म्हटले तरच मी लढणार आहे. कारण मतदार संघ हा आपली कर्मभुमी असते आणि संपुर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. यामुळे कसलाही भेदभाव न करता संपुर्ण महाराष्ट्रात काम करणार आहे. 
 
शिवसेनेचे इनकमिंग स्किलबेस्ड 
गामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभुमीवर शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमूख आदित्य ठाकरे यांनी शनीवारी (ता.31) जन अशिर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात स्पष्ट केले की, शिवसेनेत सध्या इनकमिंग सुरु आहे मात्र शिवसेनेत स्किलबेस्ड आहे . शिवसैनिकांत मिसळून काम करु शकतील, ज्यांचा महाराष्ट्राला उपयोग होईल अशांचे इनकमिंग होत असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले. 

कर्जमुक्‍ती होर्डिंगवरच बघतोय 
महाराष्ट्रात बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश फार मोठा आहे. पिक विमा योजनेत त्यांची फसवणुक झाली आहे. शिवसेनेच्या दणक्‍याने दहा लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला मात्र असे अनेक शेतकरी आहेत जे पिक विम्याच्या हक्‍काच्या रकमेपासून वंचित आहेत. 
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्‍ती झाली पाहीजे अशी शिवसेनेची मागणी आहे.

 शिवसेनेने लढा उभारला, सरकारने कर्जमुक्‍ती जाहीर केली. कर्जमुक्‍ती सर्वत्र दिसत आहे, होर्डिंगवरच बघायला मिळते मात्र ती अजून गावांपर्यंत पोहचली नाही. मला कर्जमुक्‍ती झाली असे सांगणारा मला आतापर्यंत एकही शेतकरी भेटला नाही. यात त्रुटी आहेत यातील त्रूटी दूर करण्याबाबत आपण सरकारला विनंती करणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT