mla sambhaji patil nilangekar target amit deshmukh news 
छत्रपती संभाजीनगर

रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना लातूरातून गेला, तर जनता तु्म्हाला माफ करणार नाही..

सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुर्ण झाला नााही आणि मराठवाड्यातील रेल्वे बोगी निर्मीतीचा हा मोठा आणि महत्वाचा प्रकल्प जर इतर ठिकाणी गेला, तर लातूरची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही.

हरी तुगावकर

लातूर ः रेल्वे बोगी कारखान्याला पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पा करिता विशेष बाब म्हणून दोनशे कोटींचा निधी दिला होता. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया देखील पार पडली असतांना अद्यापही या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. हजारो तरूणांच्या हाताला काम देणाऱ्या रेल्वे बोगी प्रकल्पाला पाणी कमी पडले आणि तो लातूरातून गेला, तर जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधला.

महापालिकेला सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून २०० कोटींचा निधी तत्कालीन युती सरकारने मंजुर केला होता. विशेष म्हणजे महापालिकेत तेव्हा भाजपची सत्ता असल्यामुळे या प्रकल्पाची निविदा प्रक्रियाही पार पाडण्यात आली होती. परंतु त्यांनतर राज्यात व महापालिकेत झालेल्या सत्तातंराचा फटका एसटीपी प्रकल्पाला बसल्याचे बोलले जाते. हा प्रकल्प केवळ लातूर शहरवासियांसाठीच नाही तर येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे बोगी निर्मीती कारखान्यासाठी देखील महत्वाचा ठरणार आहे. परंतु निविदा प्रक्रिया झालेली असतांना एसटीपी प्रकल्पांचे काम रखडले आहे.

यावर जिल्हाधिकारी कार्यालयात  नुकत्याच झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी एसटीपी प्रकल्प रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुर्ण झाला नााही आणि मराठवाड्यातील रेल्वे बोगी निर्मीतीचा हा मोठा आणि महत्वाचा प्रकल्प जर इतर ठिकाणी गेला, तर लातूरची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, अशा तीव्र शब्दांत निलंगेकर यांनी अप्रत्यक्षरित्या अमित देशमुख यांच्यावर निशाना साधला.

लातूर जिल्हा व मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा देशातील चौथा रेल्वे बोगी तयार करणारा कारखाना लातूरमध्ये उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या प्रकल्पाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. परंतु लातूर औद्याेगिक वसाहतीसह रेल्वे बोगी कारखान्याला पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पा करिता विशेष बाब म्हणून दोनशे कोटींचा निधी दिला होता.

Edited By : jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT