Imtiaz-Jaleel.in parliament
Imtiaz-Jaleel.in parliament 
छत्रपती संभाजीनगर

 भाविक तुमच्या सरकारसाठी साईबाबांकडे प्रार्थना करतील : इम्तियाज जलील

जगदीश पानसरे

औरंगाबादः दक्षिण भारतासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना औरंगाबादहून शिर्डीला जातांना खराब रस्त्याचा सामना करावा लागतो. तासभराच्या अतंरासाठी तीन तास प्रवास करावा लागतो, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता सुपर एक्‍स्प्रेस वे करा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेत केली.

देशातील दुसऱ्या क्रमाकांचे देवस्थान म्हणून महाराष्ट्रातील शिर्डी संस्थान ओळखले जाते. केवळ देशच नाही तर जगभरातून भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. दक्षिण भारतातून येणारे अनेक भक्त हे औरंगाबाद मार्गेच शिर्डीला जाणे पसंत करतात. पण शंभर किलोमीटर अतंराच्या या रस्त्याची खड्यांमुळे दुरावस्था झाली आहे या विषयाकडे इम्तियाज जलील यांनी लोकसभा अध्यक्षाचे लक्ष वेधले.

इम्तियाज जलील म्हणाले, लाखो, करोडो भाविकाचे श्रध्दास्थान असणाऱ्या शिर्डीला जातांना श्रध्दाळूंची मोठी गैरसोय होते. रस्त्याच्या दुरावस्थे मुळे तासाभराच्या अतंरासाठी भाविकांना तीन तासांचा प्रवास करावा लागतो. औरंगाबाद-शिर्डी हा रस्ता सुपर एक्‍स्प्रेस वे करावा अशी मागणी आम्ही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली होती, पण त्यावर विचार झाला नाही.

हा मार्ग सुपर एक्‍स्प्रेस वे मध्ये रुपांतरीत केला तर औरंगाबादहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होईल आणि त्यांचा वेळ, पैसाही वाचेल. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी संबंधित विभागाला औरंगाबाद-शिर्डी रस्ता सुपर एक्‍स्प्रेस वे करण्या संदर्भात सूचना द्यावी. असे झाल्यास ते आपल्या सरकारसाठी देखील चागंले होईल, शिर्डीला जाणारे भाविक साईबाबांबकडे आपल्या सरकारसाठी देखील प्रार्थना करतील असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT