Modi-Shah-Jaleel
Modi-Shah-Jaleel 
छत्रपती संभाजीनगर

मोदी ,शहा देशाला आपली जहागीर समजत आहेत : इमतियाज जलील 

सरकारनामा

औरंगाबाद : बहुमताच्या जोरावर देशात आम्ही कुठलाही कायदा आणू शकतो, असा समज केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारचा झाला आहे . पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही या देशाला आपली जहागिर समजू लागले आहेत अशी टीका एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केली.


 लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत नागरिकत्व विधेयक पास झाल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे । या कायद्याच्या विरोधात येत्या 20 तारखेला एमआयएम संपूर्ण राज्यात मोर्चा काढणार  असल्याची घोषणा देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी केली .


इमतियाज जलील म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला तोडण्या मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार कडून सुरू आहे. नागरिकत्व विधेयकाला सर्वाधिक विरोध जर संसदेत कोणी केला असेल तर तो बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांनी कायद्याच्या चौकटीत राहून केला आहे .


घटनेला न जुमानता केवळ आमच्याकडे बहुमत आहे म्हणून भाजपकडून अन्यायकारक कायदे लादले जात आहेत. यामुळे लोक दहशतीच्या वातावरणात असून केंद्रातील भाजप सरकारकडून अशा प्रकारचे कायदे तयार करून चाचपणी केली जात आहे .  मात्र नागरिकत्व कायदा हा समाजातील एका विशिष्ट घटकावर अन्याय करणारा असल्यामुळे लोकांचा याला विरोध सुरू झाला आहे .


सर्व जाती-धर्माचे लोक या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे . लोकांच्या संतापाला वाट करून देण्यासाठी येत्या 20 डिसेंबरला एमआयएमच्या वतीने दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात, तालुक्यात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे . 


यापूर्वी केंद्र सरकारने तीन तलाक, कलम 370 चुकीच्या पद्धतीने लागू केले. आता नागरिकत्व विधेयकाच्या  माध्यमातून पुन्हा नवा कायदा देशावर लादला जात आहे असा आरोप देखील इम्तियाज यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT