maulana-vs-Imtiaz
maulana-vs-Imtiaz 
छत्रपती संभाजीनगर

इम्तियाज जलील धक्काबुक्की प्रकरण: कदीर मौलानांना  अटक व सुटका

सरकारनामा

औरंगाबादः खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुकी प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहेलवान व कदीर मौलाना व त्यांचा मुलगा ओसामा कदीर याला जिन्सी पोलिसांनी सोमवारी (ता. 21) रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना व खासदार इम्तियाज जलील यांच्यात सोमवारी सायंकाळी बाचाबाची व धक्काबुक्की झाली. हा प्रकार कटकट गेट भागात घडला होता. त्यानंतर एमआयएम कार्यकर्त्यांचा जमाव कदीर मौलाना यांच्या घरावर चालून गेला होता; परंतु पोलिसांची कुमक तेथे असल्याने कार्यकर्त्यांना त्यांनी हुसकावून लावले. यानंतर हाच जमाव जिन्सी पोलिस ठाण्यासमोर आला होता.

खबरदारी म्हणुन कदीर मौलाना व खासदार इम्तियाज जलील यांच्या घरांभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. रात्री उशिरा या प्रकरणी एमआयएमतर्फे इम्रान अब्दुल अजीज कादरी यांनी तक्रार दिली. त्यानुसार कदीर मौलाना, त्यांचा मुलगा ओसामा, मौलाना यांचा भाऊ व नगरसेवक अज्जु पहेलवान यांच्यासह दहा ते बाराजणांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात दंगलीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर या सर्वांना अटक करुन सकाळी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT