State minister Abdul sattar visit in jalna news
State minister Abdul sattar visit in jalna news 
छत्रपती संभाजीनगर

सरकारवर टिका करण्यापेक्षा विरोधकांनी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी जोर लावावा..

लक्ष्मण सोळुंके

जालना ः अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील ज्या भागात पावसामुळे नुकसान झाले त्या भागातील महसुल वसुली थांबवण्याचे आदेश लवकरच दिले जाणार आहेत. पण शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. विरोधकांनी सरकारवर टिका करण्यात आपली शक्ती वाया न घालवता तिचा वापर केंद्राकडून राज्याला मदत कशी मिळेल, यासाठी करावा, असा टोला महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.

जालना तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुंभेफळ,अंतरवाला गावांना भेट देऊन सत्तार यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत पंचनामे पुर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले. वेळ पडली तर कर्ज काढू पण शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय सरकार थांबणार नाही, असे आश्वासनही सत्तार यांनी यावेळी दिले.

सत्तार म्हणाले, ज्यातील ज्या भागात पावसामुळे जास्त नुकसान झालंय.त्या भागातील महसूल वसुली थांबवण्याचे आदेश लवकरच दिलेे जाणार आहेत. ज्या ज्या भागात नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे..पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार आहेे. विरोधक ज्या ताकदीने राज्य सरकारवर टीका करतंय तेवढीच ताकद त्यांनी केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी.

विरोधकांनी राज्याची आर्थिक परिस्थिती खराब करून ठेवल्यानेच ही परिस्थिती सुधारण्यासाठी मंत्री दौरे करत आहेत. विरोधकांनी केंद्रात वजन वापरून महाराष्ट्राला मदत करायला हवी, तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी विरोधकांचाही सिंहाचा वाटा हवा असा टोलाही सत्तार यांनी भाजप नेत्यांना लगावला.

दानवे, मेटेंच्या टिकेचा समाचार..

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. या टिकेचाही सत्तार यांनी समाचार घेतला. रावसाहेब दानवे हे मुख्यमंत्र्यांवरच काय पण पंतप्रधानांवर देखील टिका करू शकतात, असा चिमटा काढला. तर बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहात हे सिध्द करा, नाही तर खुर्ची खाली करा, या विनायक मेटेंच्या टिकेवर, मुख्यमंत्री राज्यात अत्यंत चांगले आणि सक्षमपणे काम करत आहेत, त्यामुळे तेच बाळासाहेबांचे वारसदार आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नसल्याचे, सत्तार म्हणाले.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT