danave-police sarkarnama
danave-police sarkarnama 
छत्रपती संभाजीनगर

दानवेंवर खोतकरांची खेळी यशस्वी : त्या पाच पोलिसांचे निलंबन मागे

सरकारनामा ब्यूरो

जालना ः पूर्वपरवानगी न घेता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जाफराबाद येथील संपर्क कार्यालयाची झाडाझडती पोलिसांनी घेतली होती. याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी शनिवारी (ता.१९) दिली. (Five Police suspended after complaint by Raosaheb Danvae) 

जाफराबाद येथे एका पत्रकारावर वाळूमाफियांनी हल्ला केला होता. त्यानंतर जाफराबाद पोलिसांना या हल्ल्यातील काही संशयित एका राजकीय नेत्याच्या संपर्क कार्यालयात असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, यासंदर्भात वरिष्ठांना माहिती न देता तसेच पूर्वपरवानगी न घेता जाफराबाद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील संपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतली.

या प्रकरणी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे श्री. दानवे यांनी तक्रार केल्यानंतर पोलिस अधीक्षक श्री. देशमुख यांनी चौकशीनंतर पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे, पोलिस कर्मचारी मंगलसिंग सोळंके, सचिन तिडके, शाबान तडवी यांना ता. १४ जूनला निलंबित केले होते. मात्र, यात पोलिसांची काहीच चूक नसताना निलंबनाची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी केली होती. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवेही त्यांच्यासोबत होते. त्यानंतर या पाचजणांचे निलंबन शनिवारी मागे घेण्यात आल्याचे अपर पोलिस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT