Jaydatta Kshirsagar - Sharad Pawar
Jaydatta Kshirsagar - Sharad Pawar 
छत्रपती संभाजीनगर

मुंडेंचे घर पवारांनीच फोडले - जयदत्त क्षीरसागरांचा आरोप

दत्ता देशमुख

बीड  : गेल्या १५ वर्षांत काय केले हे आज विचारता, तेंव्हा का नाही विचारले? पक्षात होणारी कोंडी फोडण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला. घरफोडी करणाऱ्यांचा पक्ष आता बुडणार आहे," असा टोला रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे घर पवारांनीच फोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

रविवारी (ता. २२) शिवसेनेच्या मेळाव्यात क्षीरसागर बोलत होते. मागच्या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर पक्षांतराच्या कारणाबाबत टिका करत आता विकासासाठी गेला असे कारण सांगता तर पंधरा वर्षे सत्ता तुमच्या हातात दिली तेव्हा काय केले, असा सवाल केला होता. त्याला क्षीरसागर यांनी उत्तर दिले. 

''मला कुणाबद्दल घृणा नाही वाईट मतही नाही. परंतु, पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरे फोडली'',  असा गंभीर आरोपही जयदत्त क्षीरसागर यांनी केला. त्यात पहिल्यांदा दिवंगत मुंडेंचे घर फोडल्याचेही ते म्हणाले. त्याचे आता पवारांनीच आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT