Kishanchand Tanwani Enters Shivsena
Kishanchand Tanwani Enters Shivsena 
छत्रपती संभाजीनगर

किशनचंद तनवाणी, बारवाल यांचा शिवसेनेत प्रवेश

जगदीश पानसरे

औरंगाबाद : एप्रिल मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकी पूर्वीच भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शहरविकास आघाडीचे गजानन बारवाल, भाजप उपशराध्यक बाळासाहेब गायकवाड  यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

महाविकास आघाडी विरुद्ध स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला निवडणुकीआधीच हा मोठा धक्का समजला जातो. लवकरच भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुका होईपर्यंत तरी शहराध्यक्षपदी मुदतवाढ मिळावी अशी इच्छा तनवाणी यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. 

मात्र जुन्या नव्याच्या वादामुळे भाजपने कामगार मोर्चाचे अध्यक्ष संजय केनेकर यांची शहराध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर प्रचंड नाराज असलेल्या तनवाणी यांनी शिवसेनेशी जवळीक वाढवत भाजपला संकेत दिले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT