Mahadeo Jankar Wants to go to Delhi
Mahadeo Jankar Wants to go to Delhi 
छत्रपती संभाजीनगर

कोणाशीही युती करुन महादेव जानकरांना दिल्ली गाठायचीय

दत्ता देशमुख

बीड : आपण कोणाशीही युती करु पण दिल्लीला जाऊच अशी इच्छा राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बोलून दाखविली. महायुती सरकारच्या काळात त्यांना पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स अशा विविध खात्यांचे मंत्रीपद मिळाले होते.

तसे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे महादेव जानकर मुंडेंमुळेच महायुतीमध्ये आले होते. योगायोगाने राज्यात सरकार आल्यानंतर तत्कानि महायुतीमधील रासपला महादेव जानकर यांच्या माध्यमातून राज्यात कॅबीनेट मंत्रीपदासह त्यांच्या समर्थकांना महामंडळांवरही स्थान मिळाले. यावेळी वेगळीच चक्रे फिरली आणि महायुती ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे राज्यात प्रतिनिधित्व केलेल्या महादेव जानकर यांचे राज्यात मन रमत नसल्याचे दिसत आहे. 

रविवारी बीडला एका पुरस्कार वितरण समारंभाला आलेल्या जानकरांनीच ही इच्छा बोलून दाखविली. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर विविध क्षेत्रांत यश संपादन करा, असा सल्ला देत आपली दिल्लीला जाण्याची इच्छा अजून अधुरी असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवितानाच ही इच्छा पुरी करण्यासाठी 'कोणाशीही युती करेन, ती कशी करेन, हे सांगणार नाही; पण एकदा दिल्लीला जाणारच' असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT