छत्रपती संभाजीनगर

आयुक्त नाहीत हे नशिब नाहीतर आणखी एक गुन्हा दाखल झाला असता - बच्चू कडू 

माधव इतबारे

औरंगाबाद : अपंगाच्या विविध मागण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 18) महापालिकेत घेराव आंदोलन करण्यात आले. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून मंगळवारपासूनच सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयात अपंगांना प्रवेश आणि पार्किंग मोफत सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आयुक्त उपस्थित नाहीत हे नशिब नाहीतर आणखी एक गुन्हा दाखल झाला असता, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

महापालिका मुख्यालयासमोर सकाळी अकरा वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. मात्र यावेळी एकही पदाधिकारी हजर नसल्याने आंदोलकांना साडेबारा वाजेपर्यंत ताटकळावे लागले. महापौरांचे आगमन होताच बच्चू कडू यांच्यासह शिष्टमंडळाने त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी अपंगांचा राखीव निधी वाटप करावा, अपंगांच्या नोंदी घ्याव्यात, महापालिकेचे व्यावसायिक गाळे अपंगांना द्यावेत, घरकुल योजनांचा लाभ द्यावा, पार्किंग अपंगांना मोफत करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. 

आयुक्त नाहीत त्यांचे नशीब
यावेळी बच्चू कडू म्हणाले, अपंगांवर आंदोलन करण्याची वेळ आली ही बाब निंदनीयच आहे. येत्या पंधरा दिवसात मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर काय परिणाम होईल, ते प्रशासनाने बघावे. आयुक्त नाहीत, त्यांचे नशीब. अन्यथा आणखी एक गुन्हा दाखल झाला असता. उपायुक्तांना खुर्चीसहित उचलून फेकू, असा इशाराही त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT