Mp imtiaz jalil thanks to nitin gakari news
Mp imtiaz jalil thanks to nitin gakari news 
छत्रपती संभाजीनगर

एमआयएमच्या खासदाराने मानले भाजप मंत्र्याचे आभार

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. मतदारसंघातून शिर्डी या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधीची केलेली मागणी गडकरी यांनी पुर्ण करत २५ कोटींचा निधी मंजुर केल्यामुळे इम्तियाज यांनी ट्विट करत गडकरी यांना धन्यवाद म्हटले आहे.

औरंगाबादहहून वैजापूर मार्गे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर आंध्र प्रदेश व इतर राज्यातून येणारे भाविक शिर्डीला बाय रोड जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी या रस्त्याचा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता. या रस्त्याच्या कामासाठी निधी दिला तर सगळ्यांनाच शिर्डीला कमी वेळात दर्शनासाठी जाता येईल, असे सांगत त्यांनी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.

या खात्याचे मंत्री व ज्यांना रोडकरी म्हणून संबोधले जाते त्या नितीन गडकरी यांच्याकडे देखील राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून या औरंगाबाद-वैजापूर-शिर्डी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. अखेर इम्तियाज यांच्या पाठपुराव्याला यश येऊन गडकरी यांनी या रस्त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केल्याची घोषणा नुकतीच केली. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य आता लवकरच उजळेल आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसह या भागातील नागरिकांना देखील याचा मोठा लाभ होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या मागणीला प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल इम्तियाज यांनी त्यांचे आभार मानले आहे. आपल्या ट्वीटमध्ये इम्तियाज म्हणाले, औरंगाबाद- वैजापूर- शिर्डी या रस्त्याच्या कामासाठी आपण २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हे काम राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून करत आहात,त्याबद्दल गडकरीजी आपले खूप खूप धन्यवाद,

या रस्त्याची खूप दुर्दशा झाली होती, मी हा प्रश्न सोडवेन असा विश्वास मतदारसंघातील नागरिकांना आणि शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना दिला होता, निश्चितच या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यावर याचा लाभ शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना होणार असल्याचेही इम्तियाज यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT