mp imtiaz jalil in action mod news
mp imtiaz jalil in action mod news 
छत्रपती संभाजीनगर

हिंदूना जागे करण्याचे काम झाले म्हणत एमआयएमचे आंदोलन मागे..

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः धार्मिक स्थळ खुली करा अन्यथा रस्त्यावर उतरून मी स्वतः मंदिर, मशीद खुली करीन असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपुर्वी राज्य सरकारला दिला होता. त्याप्रमाणे आज गणेश विसर्जनाच्या दिवशी शहराती खडकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देऊन मंदिर खुले करण्याचे आंदोलन इम्तियाज यांनी हाती घेतले होते, त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. शिवसेना नेते चंद्रकांत खैर हे देखील शिवसैनिकांसह मंदिर परिसरात जमा झाल्याने तणावाचे वातावरण होते. अखेर पोलीसांनी इम्तियाज जलील यांची समजूत घातली आणि त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. तीन दिवसांत धार्मिक स्थळे खुली झाली नाही तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचेही इम्तियाज यांनी सांगितले.

पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर आज एमआयएमचे आंदोलन होणार कसे होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गणेश विसर्जनाचा दिवस असल्याने आज खासदार इम्तियाज जलील दुपारी दोनच्या सुमारास खडकेश्वर येथील महादेव मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना मंदिर खुले करण्याचे आवाहन करणार होते. त्यामुळे या भागात मोठा पोलिस बदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तर दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शेकडो शिवसैनिक देखील मंदिर परिसरात दाखल झाले होते. मदिर खुली करण्यास आम्ही समर्थ आहोत, मासं खाणाऱ्या इम्तियाज जलील यांचे हात आमच्या मंदिराला लागू देणार नाही, कोण येतो ते मी बघतोच अशी आक्रम भूमिका खैरे यांनी घेतली होती. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी इम्तियाज जलील यांना मंदिर परिसररात आंदोलन न करण्याची विनंतरी केली. तसेच तिथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो,तेव्हा आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली होती.

माझे काम झाले..

आंदोलन मागे घेतल्यानंतर इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला टोला लगावण्याची संधी सोडली नाही. माझा हेतू हिंदूना  जागे करण्याचा होता. मी मंदििर खुले करण्यासाठी जाणार म्हटल्यावर तिथे शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक पोहचले हे माझ्यासाठी खूप मोठे आहे. आता तीन दिवसांत निर्णय झाला नाही, तर पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT