minister sanjay bansode tells mistery behind jacket 
छत्रपती संभाजीनगर

..... म्हणून मी जॅकेट घालतो - राज्यमंत्री संजय बनसोडे

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील आठ खात्याचा राज्यमंञी असलो तरी साधा कार्यकर्ता असल्याने माझी तेवढी ओळख नाही. नेत्यांसोबत एका कार्यक्रमात गेल्यानंतर माझी ओळक नसल्याने तेथील लोकांनी मलाच बाजूला सारले. नेत्यांनी माझी ओळख करून दिली तेव्हा मला मान सन्मान मिळाला. त्याच कार्यक्रमात नेत्यांनी मला जॅकेट घालण्याचा सल्ला देत डझनभर जॅकेट घेऊन दिली.

सचिन शिवशेट्टे

उदगीर :  महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील आठ खात्याचा  राज्यमंञी असलो तरी साधा कार्यकर्ता असल्याने माझी तेवढी ओळख नाही. नेत्यांसोबत एका कार्यक्रमात गेल्यानंतर माझी ओळक नसल्याने तेथील लोकांनी मलाच बाजूला सारले. नेत्यांनी माझी ओळख करून दिली तेव्हा मला मान सन्मान मिळाला. त्याच कार्यक्रमात नेत्यांनी मला जॅकेट घालण्याचा सल्ला देत डझनभर जॅकेट घेऊन दिली.

बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी (ता. 15) येथील पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात जॅकेटमागील हे गुपित उघड गेले. 

जॅकेट घातलो तरी मतदारसंघातील सर्वांसाठी मी पुर्वीचाच विनाजॅकेटचाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,  माझा जन्म  सामान्य कुटुंबात झाला आहे. तुमच्या आशिर्वादाने राज्याच नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. मला सदैव तुमच्या सोबत राहुन काम करायच आहे. जॅकेट घालू लागल्यापासून माझ्यात बदल झाला आहे, असे तुम्हाला वाटत असेल. पण तसे बिल्कुल नाही. मी साधी पॅट साधा शर्टच नेहमी वापरतो. पण हे जॅकेट अचानक कोठून आले, असा प्रश्न  तुम्हाला पडला असेल,  असे सांगत त्यांनी नेत्यांसोबत कार्यक्रमाला गेलेला किस्सा सांगितले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT