Meghana Bordikar rides Cycle
Meghana Bordikar rides Cycle 
छत्रपती संभाजीनगर

प्रदूषण मुक्तीसाठी आमदार मेघना बोर्डीकर सायकलवर स्वार

गणेश पांडे

परभणी : ध्वनि, वायू प्रदूषणापासून मुक्तता मिळावी यासाठी जनजागृती करण्यासाठी आयोजित सायकल स्पर्धेत जिंतूर सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी चक्क ११ किलोमीटर सायकल स्वारी केली.

जिंतूर शहरातील सायकलर समूह व न्यू शर्मा ब्रदर्स सायकल डीलर यांच्यावतीने रविवारी (दि.१९) आयोजित अकरा किलो मिटर सायक्लोथॉन स्पर्धेत आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, महिला,अधिकारी व विद्यार्थी यांच्यासह आठशे सायकलस्वारांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेत प्रदुषण प्रदुषणमुक्तीचा संदेश दिला. शहर व परिसरात वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टिने नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी नूतन वर्षाचे औचित्य साधून क्रॉस बाईक प्रेसेंट सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली.

आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रभाकर बुधवंत होते, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, तहसीलदार सुरेश शेजूळ, चेतन शर्मा, गिरीश वट्टमवार,राजेश राठोड,संतोष चौधरी,प्राचार्य बळीराम वटाणे, मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, ज्ञानेश्वर मते,नारायण भुरे आदीची उपस्थित होते. स्पर्धा साई मैदान, नेमगिरी पहिली कमान व परत साई मैदान यामार्गावर आयोजित केली होती. सहभागी प्रत्येक स्पर्धकास सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT