deshmukh-bhalerao
deshmukh-bhalerao 
छत्रपती संभाजीनगर

आमदार सुधाकर भालेराव यांचा देशमुखांवर पलटवार

विकास गाढवे

लातूर  : यह अंतर की बात है, भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांची मन की बात लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंतके साथ है, असे सांगून आमदार अमित देशमुख यांनी चांगलीच राजकीय खळबळ उडवून दिली होती. उदगीरच्या प्रचार सभेत आमदार देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला. 

याला उत्तर देत आमदार भालेराव यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी आमदार देशमुख हेच भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट करत जळकोट येथे गुरूवारी (ता. 11) पत्रकार परिषदेत बोलताना यह मेरे मन की आपके तन की बात है, असा पलटवार आमदार देशमुख यांच्यावर केला.

आमदार भालेराव व श्री. कामंत हे मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करतात. हा धागा पकडून आमदार देशमुख यांनी उदगीर येथे मागील आठवड्यात झालेल्या सभेत भालेराव व कामंत यांचे जुगाड लावण्याचा प्रयत्न केला. भालेराव यांचा कामंत यांना आतून पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगत भालेराव यांची नस दाबण्याचा प्रयत्न केला होता. 

 भाजपने लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी डावलल्याने भालेराव यांच्या समर्थकांत असलेल्या सुप्त नाराजीचा फायदाही घेण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केला. एका दगडात अनेक पक्षी मारताना भालेराव यांच्यावर संशयाचे भोवळ उठवले होते. त्याला उत्तर देताना आमदार भालेराव यांनी आमदार देशमुख हेच भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगून पलटवार केला. 

आमदारकीच्या नऊ वर्षाच्या काळात मी काहीच चूक न केल्याने विरोधकांना माझ्याविरूद्ध बोलण्यास काहीच मुद्दा नाही. यामुळेच कॉंग्रेसचे नेते मतदारांची दिशाभूल करत आहेत. देशमुख हे एका चांगल्या राजकीय घराण्यातील असून त्यांना असे बोलणे शोभत नसल्याची टिकाही त्यांनी केली. कॉंग्रेसचे उमेदवार माझ्या समाजाचे असणे म्हणजे मी पक्षाशी गद्दारी करणार, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. मी पक्षाचा एकनिष्ट कार्यकर्ता आहे, असेही भालेराव यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT