महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी औरंगाबाद मनपा आयुक्त डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले आणि त्यांना मदतीची ग्वाही दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी औरंगाबाद मनपा आयुक्त डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले आणि त्यांना मदतीची ग्वाही दिली. 
छत्रपती संभाजीनगर

मनसेकडून औरंगाबाद महापालिका आयुक्तांचे अभिनंदन

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः महापालिका आयुक्त डॉ. अस्तिक कुमार पांडेय व त्यांची संपुर्ण टीम ज्या प्रकारे कोरोनाच्या विरोधात काम करत आहेत, ते अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन करते, आणि कोरोना विरोधातील लढाईत आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी मनपा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिली. यावेळी मनसेच्या वतीने काही सूचना व मागण्यांचे निवेदनही आयुक्तांना देण्यात आले.

औरंगाबादेत कोरोनाबाधित महिला आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. त्यानंतर प्रशासन आणि महापालिका यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने केलेल्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून आले आणि बऱ्याच प्रमाणात आपण कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखू शकलो. पण अजूनही धोका टळलेला नाही याची जाणीव सगळ्यांनाच आहे. राज्यपातळीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत, तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात स्थानिक प्रशासन आणि यंत्रणा व्यस्थ आहेत.

अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून त्यांच्या चांगल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील नागरिक म्हणून आपले कर्तव्य असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने योची जाणीव ठेवत महापालिका आयुक्त डॉ. अस्तीक कुमार पांडेय यांचे व त्यांच्या संपुर्ण टिमचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी पांडेय यांची भेट घेत त्यांना एक निवेदनही दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरीक भयभीत झाले आहेत, अशावेळी साधारण सर्दी असेल तरी ते घाबरून जातात. जवळच्या डॉक्टरांना कोरोनाबद्दल माहिती असली तरी त्यातील ते तज्ञ नसल्यामुळे नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यात अडचणी येतात. अशा वेळी महापालिका आरोग्य केंद्रांची मदत मिळणे गरजेचे असते. 

त्यासाठी शहरातील स्थानिक डॉक्टर आणि महापालिका आरोग्य केंद्रांचा समन्वय ठेवण्यासाठी काही पाऊले उचलणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाशी किंवा संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी हे आवश्यक आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांना देखील ही सूचना आवडली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य पाऊले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे मनसेने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT