Pritam Munde Give Fund for PPE Kits
Pritam Munde Give Fund for PPE Kits 
छत्रपती संभाजीनगर

एक हजार सुरक्षा किटसाठी डॉ. प्रितम मुंडेंकडून खासदार निधी

सरकारनामा ब्युरो

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी भविष्यातील संभाव्य धोका व पूर्व तयारीच्या दृष्टीने खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून  जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईचे स्वा.रा.ती.वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाचशे सुरक्षा किट्स साठी निधी उपलब्ध करून दिला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी तसेच स्वा.रा.ती रुग्णालयाचे अधिष्ठाता व डॉक्टरांशी चर्चा केली व रुग्णांच्या अतिशय जवळून संपर्कात येणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी पाचशे व अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी पाचशे विशिष्ट सूट,मास्क,व इतर वस्तूंच्या पीपीई किट्स उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात अद्याप कुणालाही कोरोनाची बाधा झाली नसली तरी संभाव्य धोका व पूर्व तयारीच्या दृष्टीने कोरोना बाधित रुग्णांच्या सतत संपर्कात येणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी या दृष्टिकोनातून खासदार प्रितम मुंडे यांनी त्यांच्या खासदार निधीतून सुरक्षा किटस उपलब्ध करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.  कालच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान सहायता निधी मध्ये 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT